टिपरे returns episode 5Zee marathi वर पुन्हा एकवार “टिपरे” चे episode सुरू झालापासून जो प्रतिसाद तुमचा मिळतोय, त्याने एकच गोष्ट सतत जाणवते की लोकांना चांगलं पाहायचय! मग त्यांच्या अभिरूचीला सुरूंग लावण्याचं काम नक्की कोण करतय? २००१ सालची जुनी मालिका आजही relate होते मग, आत्ताच्या नव्या मालिका जुन्या सारख्या का वाटतात? असो.......

२०२० मधे टिपरे नेमके कोणत्या परीस्थीतीत आहेत, याविषयी आपल्याला interest !!! त्यांच्या डायरीची पान चाळण्याचं सुख कोणीही हिरावून घेणार नाही हे नक्की!!!!!


शिऱ्याची डायरी

१४ जून २०२०.

जे ठरवलं ते करून दाखवलच. आज आमच्या व्यवसायाला सुरूवात झालीच. सोसायटी गेटसमोर आमच्या भाजीचा स्टाॅल लागलाच. मराठी माणसांचं व्यवसायात पदार्पण झालचं. हे युपी बिहार वाले परत येण्याआधी आम्ही भाजी धंद्यावर आमचं साम्राज्य निर्माण करण्याचा पण केलाय. पण, त्याच अडचणीही खुप आहेत. पिकतं तिथे विकलं जात नाही हेच खरं. सोसायटीवाले प्रत्येक खरेदीत discount मागतायत. ५ रूपयाच्या मिरच्या कोथिंबीर मधेही यांना discount पाहीजे. त्यात आम्ही तिघे पार्टनर, त्यामुळे एकमत होण्याचे वांदे. त्यात आमचे विरोधक प्रत्येक बाबतीत सोसायटी ॲाफिसात जाऊन आमची तक्रार करतात. सेक्रेटरी पण त्यांच्याच साईडचे. दर दोन तासांनी पत्र पाठवतायत. आबा आले तेव्हा त्यांना हे सगळ सांगितल्यावर म्हणाले... ही आघाडी टिकवणं तारेवरची कसरत आहे. पण त्यांचा “सामना” करण्याकरीता संजय काकाला सोडा त्यांच्या अंगावर!!! पण त्याआधी तुमच्या तिघांमधे एक वाक्यता असू द्या!! आजचा पहीला दिवस तसा बरा गेला. सगळ्यात जास्त भाजी आईनेच विकत घेतली. माझ्यावरच प्रेम तीचं!!! बाबा म्हणाले की, ज्या भाज्या खपवल्या आहेस त्याच पुढचे ४ दिवस खाव्या लागणार आहेत. म्हणजे ४ दिवस आई स्टाॅलवर येणार नाही? माझा धंदा बोंबललाच!!!


शामला डायरी

१४ जून २०२०

आज घरात भाज्याच भाज्या झाल्यात!! शिऱ्याच्या व्यवसायाला हातभार लागावा म्हणून यांच्या खिश्याचा भार कमी केला. हे थोडे वैतागलेच. पण मग समजावलं की, त्याला प्रोत्साहन आपण नाही तर कोण देणार! ज्या भाज्या आणल्या आहेत त्यातल्या निम्म्या शिऱ्या शलाका खात नाहीत. पण, आता शिऱ्या न खाऊन सांगतोय कुणाला? हे म्हणाले की, नाही खाल्ल्या भाज्या तर त्याच्या नरड्यात कोंबीन! मी निरोप दिलाय त्याला. शलाकाला emotionaly blackmail करावं लागणार. भावाच्या व्यवसायाची शपथ वगैरे असच काहीस!!! ऐकेल ती. शिऱ्याचं तीच पटत नाही पण, प्रेमही तेवढच आहे. पोरं गुणाची आहेत माझी! नजर नको लागायला!! त्या सुशांतसिंग का कोण, त्याची बातमी ऐकल्यापासून कससच होतय. पोरं काय

जीवाला लावून निर्णय घेतील काही सांगता येत नाही. रक्ताचं पाणी करून यांना वाढवायचं आणि मग त्यांना असं पाहायचं?? मी दोघांनाही म्हणाले, काहीही असल तरी बोला आमच्याशी. रागावलं कोणी तरी मनात ठेऊ नका. आबा म्हणाले मला... तू काळजी करू नकोस. मी असे पर्यंत तरी त्यांना puntching bag ची कमतरता जाणवणार नाही. त्यांचा friend philosopher guide घरातच आहे. मी म्हटलं, अगं बाई कोण आबा? तर म्हणाले मीच!!!!! घरात वडिलधारं असणं खुप महत्वाचं असतं.


शलाका डायरी

१५ जून २०२०

त्या आत्महत्येच्या घटनेचा event केला news channel वाल्यांनी!!! घरातल्या लोकांच्या

मुलाखती काय घेता???? त्या सुशांतसिंगच्या आधीच्या clipping वापरून केलेला एक एक episode डोकं फिरवत होता. बाबा म्हणाले की, त्रास करून घेऊ नको. दुसरं काहीतरी बघ... टाईमपास म्हणून social media वर गेले तर तिथे या celebraty चे आरोप प्रत्यारोप!

आबा म्हणाले कर्म हे फिरून येतच. ज्यांनी कोणी वाईट केलं असेल त्यांना या जन्मीची पापं याच जन्मी फेडून जावी लागणार. या क्षेत्रात खरच याव की न यावं? काहीच निर्णय घेता येत नाही. आमचे बाबा हिरो असते तर प्रश्नच नव्हता. Starkid म्हणून करीयर सुरू तरी झालं असतं. Lockdown मुळे घराबाहेर पडता येत नाही.. आणि पडल्यावर काय करायचं? याचं उत्तरही सापडत नाही.


आबांची डायरी

१६ जून २०२०

चीन सीमेवर पुन्हा गोंधळ सुरू केलाय त्या बारीक डोळ्यावाल्यांनी. आपले काही जवान शहीद झाल्याची बातमी आली तेव्हा, आपलंच कोणीतरी गेलासारखं वाटून डोळ्यात पाणी तराळलं. आपल्या भारतच्या पठीमागून कोणीतरी येऊन मीठी मारून, घात करतोय असं वाटतं. एका बाजूने पाकिस्तान, दुसऱ्या बाजूने चीन... मधे मधे लूडबाडणारा तो नेपाळ. ते दोस्त म्हणून मागून मीठी मारल्यासारखं करतात आणि त्यांचे दोन्ही हात आपला श्वास कोंडतायत. काहीच करू शकत नाही आपण! चीन तर एवढा खोटारडा आहे की, विचारायची सोय नाही. आधी तो coronavirus देऊन आर्थिक कंबरडं मोडलय, त्यात आता सीमेवर अशी अस्थीर परीस्थीती करून जीव खालीवर करतायत. ५६ इंचवाले काय करतायत ते पाहायचं! त्यांच्यावरच आता अवलंबून आपण! मी मात्र माझ्या बुध्दीनुसार काही निर्णय घेतलेत. पाकीस्तानचा निषेध करण्याकरीता त्यांचे tv वरचे repeat cricket matches पाहाणाचं मी बंद केलय. चीनचा निषेध म्हणून शिऱ्या जे चायनीज आणतो ते खाणं बंद केलय. आणि त्या नेपाळला धडा शिकवण्यासाठी आमच्या सोसायटीचा watchman बहाद्दूर याच्याशी मी बोलणं बंद केलय. मी सामांन्य माणूस एवढच

करू शकतो. एकदा तरी सरकारी फतवा काढून चीनच्या वस्तुंवर बंदी आणा मग बघाच!!!!!!


शेखरची डायरी

१७ जून २०२०

यंदाचं शालेय वर्षाचं काही समजत नाही. माझी मुलं मोठी झाली म्हणून मी या online व्यापातून सुटलो. पण शेजारी कोरगावकरांचे हाल पाहातोय. आधीच देवाने कृपाशिर्वाद एवढा दिला की जुळेच जन्माला आले. या दिवसात एकाचं संगोपन करताना दम निघतो. हे दोन दोन सुपुत्रांना सांभाळतात. आणि आयुष्यात सगळच best देण्याचा प्रयत्न करतात. कोरगावकर आणि वहिनी सध्या त्रस्त आहेत. चौथीतल्या मुलांना शाळा online शिकवते. आधीच आभ्यासाला बसवताना जड जात होतं, आता तर शाळाच घरात दाखल झालीय. सकाळी ८.३० ते दुपारी २.३०. चौथीच्या मुलांवर एवढा बोजा देण्याचा उपयोग आहे का? शिक्षण पध्दती काही समजत नाही. त्यात या private शाळांचे विविध फतवे. त्यांना म्हणे दोन seprate laptop आणि दोन seprate headphones द्यायला सांगितलेत. काय एक एक काढतील? आधीच या coronavirus ने आर्थिक गोची केलीय त्यात या demands म्हणजे.. जगावं का मरावं हा एकच प्रश्न पडलाय!!! (नटसम्राट टोनमधे)

मुळात या परीस्थीतीत मुलं ३ महिने घरात कोंडली गेलीत. त्यात तुम्ही अशा गोष्टी करून कोंडमारा आणखी वाढवणार. २०२०ने पुढे आणखी काय वाढून ठेवलय काही समजत नाही. मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून मोबाईल पासून दूर ठेवत होते कोरगावकर... तर आता शाळाच मोबाईल मधे येऊन बसली आहे. काय करावं????


केदार शिंदे

१७ जून २०२०

cut2cut.blog@gmail.com

924 views

Recent Posts

See All